मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आदोलन करत आहेत. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. आज सायंकाळी 6 वाजचा या आंदोलनाला असलेली मुदत संपली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आंदोलन उद्याही सुरु राहणार आहे. आज किंवा उद्या सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी शिंदे समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही असं विधान केलं आहे.• एकही मराठा घरी दिसणार नाही.
शिंदे समितीने मनोज जरांगेकडे वेळ मागितला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘शनिवार-रविवारच्या आत काही झालं नाही तर एकही मराठ्याचं लेकरूबाळ घरी राहणार नाही. महाराष्ट्रातील मराठा घरात दिसणार नाही. अजून सहा सात दिवस हातात आहे. आणखी वेळ गेली नाही. तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी आणि अंमलबजावणी करावी. मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे, असं जाहीर करा आणि उद्यापासूनच प्रमाणपत्र द्या.’

0 Comments