Hot Posts

6/recent/ticker-posts

आरक्षण आंदोलन मुंबई नियोजन बाबत पिंपरी चिंचवड शहरात नियोजन बैठकीचे आयोजन.

 

   

       पिंपरी चिंचवड -: पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मराठा संघटना सर्व राजकीय पक्षातील समाज बांधव,मराठा समर्थक संघटना सर्व कामगार कष्टकरी संघटना तसेच शिवजयंती उत्सव गणेशोत्सव मंडळे यांची एकत्रित नियोजन बैठक सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता खंडोबा मंदिर हाॅल आकुर्डी येथे आयोजित केली आहे.


       तरी सर्वांनी मराठा समाजासाठी अखंडपणे आपल्या सर्व सुखांचा त्याग करून अखंडपणे लढणाऱ्या मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई दौऱ्याच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य मराठा बांधवांनी कसला ही भेदभाव न मानता या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखंड मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments