Hot Posts

6/recent/ticker-posts

थाय बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धा नागपूर आमदार निवास येथे संपन्न .

 

     नागपूर -: दिनांक 25 ते 27 रोजी नागपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेसाठी राज्य भरातून 275 खेळाडूंनी सहभाग नोंदवला राज्यातील 23 जिल्ह्यातून मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे पाशा आत्तार राष्ट्रीय थाय बॉक्सिंग अध्यक्ष  , भोजपुरी ,हिंदी व मराठी प्रसिद्ध अभिनेता विकी पवार , नमो नमो राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी हटवार ,महाराष्ट्र थायबॉक्सिंग कार्याध्यक्ष विशाल माळी , सचिव अजय खेडकर , सहसचिव सलीम शेख , टेक्निकल डायरेक्टर वजीर शेख , उपस्थित होते.

     

       स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडल्या स्पर्धेमध्ये मुलांच्या संघाचे नाझीम शेख  यांनी पंच म्हणून काम पाहिले व मुलींच्या संघाचे प्रियंका अचमट्टी व अरुणा हिवरकर मॅडम यांनी पंच म्हणून काम पाहिले स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेत्यांना वाराणसी युपी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या  खेळाडूंना सुनील साठे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्पर्धेचे नियोजन बिपिन सर यांनीअतिशय उत्कृष्ट असे केले होते

      स्पर्धेमध्ये चार चॅम्पियनशिप ट्रॉफी देण्यात आल्या पहिल्या  क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पुणे जिल्ह्याला दुसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी नागपूरला तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी सातारा जिल्हा चौथ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी सांगली जिल्ह्याला मिळाली.

Post a Comment

0 Comments