• महायुती सरकार विरोधात मराठा संघटनांचा आक्रोश.
पिंपरी – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आज पिंपरी येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे पार पडले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संभाजी ब्रिगेड व छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की,अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आमचा आवाज दाबला जाणार नाही. सामाजिक न्यायासाठी आणि बहुजन हितासाठी आमचा लढा अधिक तीव्र होईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय छावा संघटना, मराठा सेवा संघ,छावा मराठा युवा महासंघ,कष्टकरी संघर्ष महासंघ,छावा मराठा सेना, जिजाऊ ब्रिगेड,राष्ट्रीय छावा संघटना,राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) विर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांच्यासह पुरोगामी विचारांचे तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते उपस्थित होते




0 Comments