मुंबई (प्रतिनिधि ) : घाटकोपर येथील भटवाडीच्या सरस्वती विद्यामंदिर शाळेत महाराणी येसुबाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी येसुबाईंच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन केले.
२७ जुलै जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीमती राणी मोरे मॅडम यांनी छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई व छत्रपती थोरले शाहूराजांच्या तेजस्वी, बाणेदार, पराक्रमी व त्यागमयी इतिहास सांगितला. जयंती सोहळा शाळेच्या संचालिका दिपाली पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला तर याकामी शिक्षिका मेघना जाधव व युवा इतिहास अभ्यासक हरीश हिरे यांचे सहकार्य लाभले.
दि.२७ जुलै रोजी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांसह राज्यभरात ठिकठिकाणी महाराणी येसुबाई म्हणजेच राजमाता राजाऊ साहेबांची जयंती साजरी झाली परंतु जयंती सोहळा रविवारी सुट्टीच्या दिवशी आल्याने सर्वच शाळांना जयंती साजरी करता आली नाही. सुट्टीच्या तांत्रिक अडचणीवर अनेक शाळांनी उपाय काढत दुसऱ्या दिवशी सोमवारी महाराणी येसुबाई जयंती साजरी केली
काही खाजगी शाळांमध्ये महाराणी येसुबाई यांची जयंती साजरी करण्याची इच्छा असताना देखील सुट्टीमुळे जयंती साजरी करता आली नाही अशा अनेक शाळांनी खंत व्यक्त केली. तरी देखील काही शाळांनी मात्र सोमवारी आपल्या शाळांमध्ये महाराणी येसुबाई (राजमाता राजाऊ) जयंती साजरी केली. अशा शाळेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मुंबई घाटकोपर येथील सरस्वती विद्यामंदिर भटवाडी शाळेचे तर स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के ( महाराणी येसुबाई ) घराण्याचे वंशज लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी कौतुक केले आहे.



0 Comments