Hot Posts

6/recent/ticker-posts

RCB च्या विजयी रॅलीत अनर्थ: गर्दीचा ताबा सुटून चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू.. - शशिकांत पाटोळे

 

      
         बेंगलुरु कर्नाटक-: RCB IPL winning rally : आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे.  १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांनामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पण या आनंदाला गालबोट लागलें आहे. आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच, हा उत्साह चाहत्यांसाठी जिवावर बेतला आहे. आयपीएल विजेत्या टीमला बघण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

       बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबी संघाला बघण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी हा अपघात घडला आहे. या चेंगरांचेगरीत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १५ टे २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.



Post a Comment

0 Comments