Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवराज्‍यभिषेक सोहळ्यातून ऐतिहासिक सत्‍याचा घालु 'जागर' : सतिश काळे

 


       • पाच व सहा जून रोजी रायगडावर उपस्‍थित रहा: संभाजी ब्रिगेडचे आवाहन.

       पिंपरी चिंचवड -: छत्रपती शिवाजी महाराज म्‍हणजे बहुजनांची अस्‍मिता राज्‍यासह देशाचा स्‍वाभिमान रयतेचा अभिमान. या राजांच्‍या शिवराज्‍यभिषेक सोहळ्यात उपस्‍थिती दर्शवून अभिवादन करू या सोहळ्यातून त्‍यांच्‍या ऐतिहासिक सत्‍याचा जागर सर्वसामान्‍यांच्‍या मनामनात रुजवू असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केले. 


         शिवराज्‍यभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दरवर्षी लाखो शिवप्रेमी आपली उपस्‍थिती दाखवतात यंदाच्‍या वर्षीही पाच आणि सहा जून रोजी रायगडावर भव्‍य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला पिंपरी-चिंचवड शहरातून हजारो शिवप्रेमी घेऊन जाणार असल्‍याचा निर्धार काळे यांनी व्‍यक्‍त केला तसेच सर्वांनी या सोहळ्यासाठी उपस्‍थित राहण्याचे आवाहन त्‍यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले काळे यांनी दिलेल्‍या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की यंदाच्‍या वर्षी शिवराज्‍यभिषेक सोहळा जागर शौर्य भक्‍तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच जून रोजी दुपारी साडे तीन ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच सहा जून रोजी सकाळी सात ते दुपारी सव्‍वा बारा वाजेपर्यंत हा सोहळा होतो.

        

        छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत. त्‍यांना या सोहळ्याच्‍या निमित्‍ताने अभिवादन करून त्‍यांच्‍या जाज्‍वल्‍य इतिहासाला सतत स्‍मरणात ठेवणे आवश्‍यक आहे. बहुजनांमध्ये त्‍यांच्‍या कार्याची प्रचिती तेवत ठेवायला हवी. रयतेसाठी त्‍यांनी दिलेला लढा याचा प्रत्‍येकानेच अभिमान बाळगायला हवा काही दुषित मनाच्‍या व्‍यक्‍ती शिवरायांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्‍न करत आहेत त्‍यांच्‍या या विद्रुप मनवृत्‍तीला छेद देण्यासाठी रायगडाच्‍या सोहळ्याचे साक्षीदार व्‍हा असे आवाहन काळे यांनी केले.


Post a Comment

0 Comments