• मस्तक आमचे झुकवुनी तुझ्या पाऊली, नाम घेतो तुझे विठू माऊली…
नाशिक -: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर “विठ्ठलाची वारी करूया साजरी, अशा भक्तिभावाने आणि सेवाभावाने प्रेरित होऊन “जिथे कमी, तिथे आम्ही” या ब्रीदवाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाचोरे बुद्रुक, ता. निफाड, जि. नाशिक येथील गरजू विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्य (रेनकोट, छत्र्या) आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाप्रसंगी अशोक सावकार, मेघा बागुल, नम्रता सावकार, अरुण निकम- मुख्याध्यापक, सुनील आंधळे, नम्रता ब्राह्मणकर, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी थोरात मॅडम, जाधव सर, चोथे मॅडम, आदि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. श्रीयुत रसाळ सर यांनी मनोगत व्यक्त करताना नमस्ते नाशिक फाउंडेशन या संस्थेचे आभार मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे संदीप देव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवी साळुंके सर यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.





0 Comments