यावल दि.२ ( जळगांव जिल्ह्यातून बुऱ्हाणपूर जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर मध्यप्रदेश पोलिस मार्फत अडवणूक होऊन त्रास देण्यात येत असल्याबाबत अनेक तक्रारी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याकडे आल्या आहेत तक्रारी समस्या सोडवण्याबाबत बुऱ्हाणपूर येथिल जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आमदार श्रीमती अर्चनादिदी चिटणीस यांच्यासह बुऱ्हाणपूर पोलिस अधीक्षक देवेन पाटीदार, उपजिल्हाधिकारी वीरसिंग तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तक्रार केली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे महाराष्ट्र राज्यातील वाहन धारक व प्रवाश्यांना होण्याच्या त्रासाची माहिती देऊन यावर तत्काळ सुधारणा करणे बाबत सूचना केल्या.यावर लवकरात लवकर योग्यती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

0 Comments