• अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे -: पुणे येथील सिम्बायोसीस या संस्थेचा लोगो असलेल्या संस्थेच्या इमारतीचा फोटो वापरुन वेबपेज वरुन सिम्बायोसीस संस्थेची वेबसाईट असल्याचे भासवुन सिम्बायोसीस या संस्थेमध्ये अॅडमिशन करुन देणे बाबत ऑनलाईन खोटी जाहीरात करुन विदयार्थ्यांना सिम्बायोसीस मध्ये अॅडमीशनचे खोटे आमीष दाखवून कॉलेज फी व्यतिरीक्त लाखो रुपयाची मागणी करुन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दिव्या, आकाश यादव, कुणाल कुमार या परराज्यातील इसमांविरुध्द दि.०२/०४/२०२५ रोजी डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन दिव्या, आकाश यादव, कुणाल कुमार हे तिनही आरोपी फरार झाले होते. अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी यांनी दोन ते तिन वेळा सदर आरोपींचा दिल्ली, हरीयाना या राज्यात जावुन शोध घेतला परंतु ते पोलीसांच्या हातावर तुरी देवून पळून जाण्यात यशस्वी होत होते. त्यानंतर तपास अधिकारी यांनी दाखल गुन्हयातील आरोपी यांचे लुक ऑऊट नोटीस जारी करुन त्यांचा दिल्ली, हरीयाना तसेच महाराष्ट्रभर कसोशीने शोध सुरु केला होता. यातील आरोपी नामे कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी, वय ३० वर्षे मुळ राज्य-बिहार याचा पुर्व गुन्हेगारी इतिहासाची माहिती घेतली असता, त्याचेविरुध्द सन-२०२१ मध्ये सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं ४६/२०२१, भा.द.वि. कलम ४१९, ४२०, १२० ब,२०१, ३४ सह आय. टी. अॅक्ट कलम ४३ (अ) (एफ) (जी) (आय), ६६ (सी), ६६ (डी) या गुन्हयात तो आरोपी असल्याचे निष्पन्न झालेले होते. सदर आरोपी याने मा. सत्र न्यायालय, पुणे येथे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता दिलेला अर्ज देखील मा. न्यायालयाने फेटाळलेला होता व सदर गुन्हयातुनही तो अद्यापपर्यंत फरार असल्याची माहिती समोर आली. आरोपी हा फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार असल्याने त्याचा पुणे, मुंबई, दिल्ली येथे शोध घेणे कामी पोलीसांचे पथके तयार करण्यात आलेली होती.
त्यानंतर दि.३१/०५/२०२५ रोजी आरोपी कुणालकुमार बिरेंद्रकुमार विद्यार्थी, हा त्याचे पत्नीसह थायलंड देशात कोलकत्ता विमानतळ येथुन जाणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेकडील एक पथक तात्काळ कोलकत्ता येथे जावुन कोलकत्ता विमानतळ येथे सापळा लावुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. नमुद आरोपी कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी, यास दाखल गुन्हयात अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्याची दि.०५/०६/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उल्हास कदम अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा है करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा.सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, संदिप शिर्के, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे, यांनी केली आहे.

0 Comments