Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड शहरात पावसामुळे ६६ ठिकाणी पडलेली झाडे महानगरपालिकेने तात्काळ हटवली

 



      पिंपरी, २२ मे २०२५ :  पिंपरी चिंचवड शहर व परिसरात २० व २१ मे याकाळात झालेल्या पावसामुळे ६६ ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी व अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ ही झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. 

      शहरामध्ये मंगळवारी (२० मे) व बुधवारी (२१ मे) जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहर परिसरातील वेगवेगळ्या भागांत झाडे, फांद्या कोसळल्या. झाडे, फांद्या कोसळल्याची माहिती महानगरपालिकेचा उद्यान विभाग तसेच अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर उद्यान विभागातील कर्मचारी व शहरातील वेगवेगळ्या भागातील अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने झाडे, फांद्या हटविण्याचे काम सुरू केले. शहर परिसरात बुधवारी (२१ मे) रात्रीपर्यंत ६६ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून ही सर्व झाडे  हटवून वाहतूक सुरळित करण्यात आली आहे, अशी माहिती उद्यान विभाग व अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments