Hot Posts

6/recent/ticker-posts

अवघ्या १२ तासाचे आत खुनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना यश.

 

     पालघर-: दि. २०/०५/२०२५ रोजी सकाळी ०६.१५ वाजण्याचे सुमारास यातील फिर्यादी श्री. विपुल दशरथ धोदडे, वय २८ वर्षे, रा. वावे-डोंगरीपाडा, ता. जि. पालघर यांची आत्या रवु रामचंद्र कामडी, वय-७० वर्षे ही वावे-डोंगरीपाडा येथील समाज मंदिरात झोपलेली असतांना, तिस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी हत्त्याराने तिचे तोंडावर हनुवटीचे खाली वार करुन गंभीर दुखापती करुन, तिचा गळा आवळुन तिस जिवेठार मारले आहे. सदर बाबत तारापुर पोलीस ठाणे गु.र.नं. २७/२०२५ बी.एन.एस. कलम १०३ (१) प्रमाणे दि. २०/०५/२०२५ रोजी १४.४३ वाजता गुन्हा दाखल आहे.

     सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक साो. पालघर यांनी स्थानिक गुन्हे शाखा पालघर व तारापुर पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे वेगवेगळी पथके तयार करुन, त्यांना सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पालघर कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहिती घेवुन, फिर्यादी व साक्षीदारांकडे विचारपूस करुन, बातमीदारांचे मदतीने माहिती मिळवुन तसेच तांत्रीक माहितीचे आधारे सदर गुन्हयात संशंयीत इसम अंकेश विलास सवरे, वय २२ वर्षे, रा. वावे डोंगरीपाडा. परनाळी ता. जि. पालघर यांस ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता यातील मयत हि त्याचे आईशी भांडण करुन त्रास देत असल्याचे मनात राग धरुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात दि. २०/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली आहे. यातील आरोपीत याने मयतावर अतिप्रसंग केल्याचा सशंय असुन, सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग हे करीत आहेत.

      सदरची कारवाई ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, श्री. प्रदिप पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउनि/रोहीत खोत, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/५८९ संजय धांगडा, पोना/कल्याण केंगार, पोअमं/प्रशांत निकम, पोअमं/वैभव जामदार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच सपोनि/निवास कणसे, पोना/मनोज अंभीरे, नेमणुक तारापुर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे.

Post a Comment

0 Comments