पिंपरी चिंचवड दि.१४-: जात धर्म स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असा कोणताच भेदभाव न करता डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्व भारतीयांना समान अधिकार दिले असे प्रतिपादन मराठा सेवा संघ प्रणित शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले.मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पिंपरी चौकातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिजाऊ ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकारी सुनिता शिंदे,वृषाली साठे,सुलभा यादव, माणिक शिंदे,शितल घरत, उज्ज्वला साळुंखे,संध्या भालेराव यांनी पुष्पहार अर्पण केला.मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, अॅड लक्ष्मण रानवडे, अशोक सातपुते,वसंत पाटील, प्रकाश बाबर,वाल्मिक माने, अनिल करंजेकर,प्रविण कदम हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव पुढे म्हणाले डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सर्वजण मोठ्या संख्येने एकजुटीने साजरी करतो.अशीच एकजूट आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करून दाखवली तर गोरगरीब जनतेला अच्छे दिन आल्या शिवाय राहणार नाहीत.यावेळी अॅड लक्ष्मण रानवडे अशोक सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले.संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी आभार मानले तर जिजाऊ ब्रिगेडच्या शितल घरत यांनी आभार मानले.

0 Comments