पिंपरी चिंचवड-: इ बाईक टॅक्सी यांना महाराष्ट्रामध्ये मान्यता दिली या निर्णयाच्या विरोधात पिंपरी चिंचवड येथे रिक्षा व टॅक्सी चालक मालक यांना न्याय देण्यासाठी व महाराष्ट्र सरकार च या निर्णय मुळे रिक्षा चालक व टॅक्सी चालक मालक यांच्या वर उपासमार करण्याची वेळ आणली आहे. आजच्या महागाईच्या काळात नोकरी मिळत नसल्याने व आर्थिक समस्या असल्याने रिक्षा व टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून, मुलांचे शिक्षण, वयोवृद्ध आईवडील यांना सांभाळत कष्ट करत होते ,पण आज त्यांच्या वर उपासमारीची वेळ महाराष्ट्र सरकारने आणली आहे.
यांच्या विरोधात छावा मराठा युवा महासंघ च्या वतीने येणार्या दिवसात मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड जन आंदोलन करण्याबाबत आज पिंपरी चिंचवड येथील थेरगाव, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मिटींग आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी छावा मराठा युवा महासंघ चे संस्थापक अध्यक्ष श्री धनाजी पाटील येळकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक यांना आवाहन केले आहे की, तुम्ही सर्व एकजुटीने रस्त्यावर उतरा,छावा मराठा युवा महासंघ तुमच्या सोबत आहे.
कारण आज इ बाईक टॅक्सी याबाबत सरकार बोलत आहे कि, हि प्रदुषण विरहित व स्वस्त आहे परंतु याबाबत छावा मराठा युवा महासंघ यांना संशय आहे की, यामध्ये खूप मोठे राजकारण असणार, कोणत्यातरी मंत्र्याचे लोक इ बाईक टॅक्सी याच्याशी संबंधित आहे,आणि यातून काही तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होणार आहे.
कारण जेव्हा महाराष्ट्रात ऑटो रिक्षाला परमिट देण्यात आले तेव्हा बहुतेक सर्व सामान्य परिस्थिती असणारे लोकांनी आपली जमापुंजी, दागिने, मुलांचे शिक्षण बाजूला ठेवून कर्ज घेऊन रिक्षा परमिट घेतले. पण या सर्व गोष्टी डोळ्याआड करून महाराष्ट्र सरकार चुकीचे निर्णय लागू करत आहे याच्या विरोधात छावा मराठा युवा महासंघ,गोरगरीब ऑटो रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी चालक मालक यांच्या सोबत आहे.
छावा मराठा युवा संघटना चे उपाध्यक्ष श्री राजन नायर, संघटक श्री गणेश सरकटे, जिल्हा उपाध्यक्ष श्री राजू पवार, जालना जिल्हा प्रभारी श्री रावसाहेब गंगाधरे व पिंपरी चिंचवड मधील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक सामील होते.


0 Comments