Hot Posts

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री, पद्मभूषण दिवंगत वसंतदादा पाटील यांची जयंती उत्साहात साजरी.

 

       पिंपरी, दि. १३ नोव्हेंबर २०२४ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण दिवंगत वसंतदादा पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

      सांगवी चौक येथील  त्यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे  यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

     या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच आरोग्य मुकादम संतोष कदम, वैशाली रणपिसे, बेसीक्स संस्थेचे अतिश डोळस, छाया बोदडे आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments