पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : कायदा व सुव्यवस्था संभाळण्याकरीता पोलीस दल कायम तत्पर असते मात्र कामाचा ताण
शारीरीक मानसिक थकवा यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही.अनेकदा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना २४ तास ऑनडयुटी रहावे लागते. त्यामुळे पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात तसेच विविध आजार उध्दभवतात त्यासाठी पिंपरी चिंचवड
पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीमध्ये पोलीस दवाखाना कार्यन्वीत असुन सदर सुसज्ज अशा पोलीस दवाखान्याचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे यांच्या हस्ते
आज दिनांक १३ / १२ / २०२४ रोजी करण्यात आले आहे. सदर हॉस्पीटल करीता डॉ. राधाकृष्ण पवार, डॉ. एमपल्ले यांचे पोलीस हॉस्पीटल उभारणी करीता वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. वैदयकिय अधिकारी डॉ. श्रीमती अनुपमा कांबळे, डॉ. श्री संजय भारती
यांचेसह ८ जनांचा स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत एकुण ४,९२७ महिला व पुरुष अधिकारी व अंमलदार कार्यरत असुन पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे
कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी पोलीस दवाखाना चालु करण्यात आला असून पोलीस अधिकारी अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना पोलीस हॉस्पीटलचा लाभ मिळणार आहे. पोलीस हॉस्पीटल उद्घाटन करीता मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा.पोलीस सह आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे)
श्री.संदिप डोईफोड, मा.पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्री. विवेक पाटील, मा. पोलीस उप आयुक्त (परि-१) श्रीमती स्वप्ना गोरे मॅडम, मा. पोलीस उप आयुक्त (परि - २) श्री. विशाल गायकवाड, मा. पोलीस उप आयुक्त (परि-
३) डॉ.शिवाजी पवार, मा. पोलीस उप आयुक्त (वाहतूक) श्री. बापु बांगर, डॉ राधाकृष्ण पवार उपसंचालक आरोग्य विभाग,पुणे, डॉ एमपल्ले प्रमुख औंध हॉस्पीटल, डॉ राउत असे वैदयकिय अधिकारी व स्टॉफ तसेच पोलीस
अधिकारी अंमलदार उपस्थित होते.

0 Comments