Hot Posts

6/recent/ticker-posts

थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीमधील खेळाडूंनी घेतली.

 

         थेरगाव, दि. १६ नोव्हेंबर २०२४ – "आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, या‌द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू", अशी शपथ थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीमधील खेळाडूंनी घेतली.

        

       चिंचवड विधानभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीमच्या वतीने थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी  येथे मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.  या मतदान जनजागृती कार्यक्रमास स्वीप टीमचे समन्वय अधिकारी राजीव घुले, अकादमीचे प्रशिक्षक विजय पाटील, भुषण सूर्यवंशी, भाऊसाहेब डांगे तसेच स्वीप टीमचे दिपक यन्नावार, मनोज माचरे, अंकुश गायकवाड, गणेश लिंगडे, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे, पांडुरंग जाधव, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, संजू भाट, विजय वाघमारे तसेच अकादमीमधील खेळाडू आणि त्यांचे पालक उपस्थित होते. 

      लोकशाहीची मुलभूत तत्वे बळकट करण्यासाठी युवा शक्तीने पुढे येऊन आवर्जून मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. तरूण मतदार हा लोकशाहीतील अतिशय चैतन्यपुर्ण घटक असून सामाजिक, आर्थिक विकासात भावी पिढीने सामिल होणे ही काळाजी गरज आहे, असे सांगून १८ वर्षे वय पुर्ण झालेल्या खेळाडूंना यावेळी  मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले

        दरम्यान, यावेळी खेळाडूंनी लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करावे असे आवाहन करणाऱ्या रांगोळ्या तसेच ‘मतदान करण्यास जाऊया, आपल्या देशाचा विकास करूया’ अशा आशयाच्या मतदानाचा संदेश देणाऱ्या हॅन्डीद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. 

Post a Comment

0 Comments