चिंचवड दि.१४-: चिंचवड विधानसभेत पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष मराठवाड्याचे सुपुत्र खासदार चंद्रशेखर आझाद (रावण) यांच्या आझाद समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा असलेले स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश काळे यांचे पारडे जड झाले आहे. विविध सामाजिक पक्ष, संघटनांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. नुकतेच त्यांना स्वराज्य सेना,अखिल भारतीय जनता दल,जनता समर्पित पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. उर्वरित दिवसात जोरदार प्रचार करण्याचा निर्धार सर्व पक्षांनी व्यक्त केलेल्या पाठिंब्यात केला आहे.
चिंचवड विधानसभेसाठी स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेतून सतीश काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीत्व विधानसभेत असावे या भावनेतून त्यांनी आपला अर्ज दाखल केला. सुरुवातीपासून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सामाजिक संघटनेचा,पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते कार्यशील राहत आहेत. त्यामुळे मतदारसंघात ९५ हजार मतांचा एकगठ्ठा मतदान काळे यांना होईल असे वर्तवले जात आहे. त्यामध्ये आणखीन भर पडली. गेल्या आठवड्यात खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीने पाठिंबा जाहीर केला होता. बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी तीन पक्षांकडून पाठिंबा देण्यात आला.स्वराज्य सेना,अखिल भारतीय जनता दल,जनता समर्पित पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. नुकतीच सतीश काळे यांना त्यांनी आपला पाठिंबा दिला असल्याचे पत्र दिले आहे._____________________________________________
: पाठिंबा देताना पक्षाची भूमिका –
तीनही पक्षाने पाठिंबा देताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या नेतृत्वाखालील प्रामाणिक आणि लोकाभिमुख कार्यपद्धती तसेच विकासाभिमुख दृष्टीकोन पाहता जनता समर्पित पक्षाने आपल्याला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपण जे समाजहिताचे उद्दिष्ट बाळगून कार्यरत आहात, ते आमच्या विचारसरणीशी जुळते. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही आपल्याला पूर्ण साथ देऊ.
--------------------------------------------------------------
विविध सामाजिक पक्ष संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच यापूर्वी केलेल्या सामाजिक कार्याचे ते फलित आहे असे मी समजतो. सामाजिक पक्ष संघटनांच्या पाठिंब्याने माझी ताकद आणखी वाढून चिंचवड विधानसभेत विजय पक्का होईल अशी मला खात्री आहे.



0 Comments