Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबई महापालिकेसाठी अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलं, मनसे, ठाकरे गटासोबत युती, कोणाला किती जागा - शशिकांत पाटोळे


           मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटानं मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानं शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती केली आहे.  राष्ट्रवादी शरद पवार गट मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती करण्यास उत्सुक होता. मात्र दुसरीकडे  राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काँग्रेससोबत जाण्याची देखील चाचपणी सुरू होती. मात्र अखेर आता राष्ट्रवादी शरद पवार गटानं मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे सोबत युती केली आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे.       

         गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली.  राष्ट्रवादी शरद पवार गट देखील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्यास उत्सुक होता, याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.  दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिवसेना ठाकरे गटाला २५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता.

      मात्र समोर आलेल्या माहितीनुसार २५ नाही तर युतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे, शिवसेना ठाकरे गट १६३ जागा, मनसे ५३ जागा वाटपाचा असा फार्मूला ठरलेला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत आता राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्यानं महायुती भाजप आणि शिवसेना शिंदे गटासमोरील आव्हान वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस ही निवडूक स्वबळावर लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या वेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठी चूरस पहायला मिळू शकते.

Post a Comment

0 Comments