पिंपरी ता.१४-: राष्ट्रवादी काँगेस पार्टी वाहतूक विभागाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.राहूल जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.पवन नव्हाडे साहेब उपस्थित होते. तसेच यावेळी वाहतूक विभाग अध्यक्ष विनोद वरखडे, शहर उपाध्यक्ष श्री स्वप्निल चव्हाण, शहरकार्याध्यक्ष श्री.अकबर शेख, सामाजिक कार्यकर्ते श्री. संजिवकुमार डोणापुरगे ,भरत मोहोड, आप्पा दौंडे ,संजीव रत्नजी तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर निवेदनात वाहतूक विभागाचे अध्यक्ष विनोद वरखडे यांनी सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत, त्यातच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जाते. त्यामुळे गोर गरिब प्रवाशांना नाहक जास्त दर द्यावा लागत आहे म्हणून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे येथे मोठे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे, तसेच शिक्षणाचे माहेरघर असल्या कारणाने कामगार तसेच विद्यार्थी पिंपरी-चिंचवड व पुणे येथे वास्तव्यास आहेत.
त्यामुळे दिवाळी सणासाठी हे विद्यार्थी व कामगार तसेच नागरिक सणासाठी गावी जातात. खास करून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र ,मराठवाडा या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. तसेच आत्ताच रेल्वेचे बुकिंग फुल झाले असून एसटी महामंडळाकडे पण खूप मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवासी नागरिकांना ट्रॅव्हल्स हाच पर्याय शिल्लक असतो, मात्र ट्रॅव्हल्स चालकांकडून या या काळात मोठ्या प्रमाणात तिकीट दर वाढवले जातात. तसेच काही ठिकाणी तिकीट दरामध्ये दुप्पट तिप्पट वाढ केली जाते. या कारणामुळे प्रवाशांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत असल्याने नागरिकांना या त्रासापासून सुटका होऊन त्यांची होणारी लुटमार थांबावी, अशी अपेक्षा वाहतुक विभाग अध्यक्ष म्हणून आपणांस करतो.
दिवाळी सणा दरम्यान प्रवासी खाजगी बसची वाहतूक पथकामार्फत तपासणी करावी. तिकीट बुकिंग काउंटरवर देखील जाऊन चेकिंग करावी व गैरप्रकार आढळल्यास कारवाही करावी, अशी मागणी आम्ही केली आहे.



0 Comments