• जरांगेच्या विरोधातील भाषा भाजप नेत्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महागात पडेल.
पिंपरी चिंचवड दि.०६/०८/२०२४-: गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाची मागणी करत आहे.
यासाठी संविधानाने दिलेल्या अधिकारात राज्यभरातील मराठा समाज शांततेत विविध प्रकारचे आंदोलने करत आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना विविध आश्वासने दिली परंतु ती पाळली नाहीत सगे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करणे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देणे याबाबत सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाची फसवणूक केली याचा परिणाम म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत भाजप सर्व सत्ताधारी महायुतीतील पक्षांचा दारुण पराभव झाला.
या गोष्टीचा भाजप नेत्यांनी गंभीरपणे विचार करून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य तसेच केंद्र सरकारवर दबाव आणायचं सोडून उलट ते मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाची लढाई लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात रोज अपमानास्पद भाषा वापरत आहेत त्यामुळे याचा दणका भाजपच्या या वाचाळ वीरांना संपूर्ण महाराष्ट्रभरातील सकल मराठा समाज येत्या विधानसभेत नक्कीच देणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय पाळीव कुत्री पिसाळली आहेत ती मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाच्या विरोधात दररोज आळीपाळीने विविध प्रकारची वक्तव्य पिसाळल्यागत करत भुंकत आहेत.
यामुळे या पिसाळलेल्या पाळीव कुत्र्यांचा पिंपरी चिंचवड शहर संभाजी ब्रिगेड बंदोबस्त करणार असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी आज दिला सदर प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे सदर प्रसिद्धीपत्रकावर पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते शहराध्यक्ष सतिश काळे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वैभव जाधव सचिव रावसाहेब गंगाधरे शहर कार्याध्यक्ष दिनेश मराठे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लाड,दरेकर,शेलार,राणे,बोंडे,भेगडे इत्यादींनी आपली तोंडे मराठा समाजाच्या विरोधात बंद ठेवावीत अन्यथा पिंपरी चिंचवड शहरात आल्यावर त्यांचा योग्य पद्धतीने सत्कार केला जाईल असा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला.





0 Comments