• या पुण्यतिथी सोहळ्याला मोशी प्राधिकरण परिसरातील भाविक भक्तांची प्रचंड गर्दी.
• या सोहळ्याप्रसंगी राजकीय सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती.
• संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मा.पंकज भाऊ पवार यांनी सोहळ्याचे उत्कृष्ट असे नियोजन केले होते.
मोशी प्राधिकरण, दि.०८-: ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ मंदिर संत नगर मोशी प्राधिकरण पुणे येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली पुण्यतिथीनिमित्त महाराजांचा रुद्राभिषेक सर्व गुरुचरित्र पारायण करणाऱ्या भाविक भक्तांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करण्यात आली दिवसभर वेगवेगळ्या भजन मंडळाच्या वतीने भजन सेवा देण्यात आली व सायंकाळी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या भावीक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आरती करण्यात आली व परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय आनंदात भक्तीमय वातावरणामध्ये महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला यामध्ये ट्रस्टच्या सर्व महिला स्वामीभक्त सर्व सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने सेवा रुपी मदत करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकजभाऊ पवार यांनी सर्व सेविकारांचं, अन्नदात्यांच, देणगीदारांचे ,सर्व माता-भगिनींच मनापासून आभार मानले. संत नगर मोशी प्राधिकरण पुन्हा एकदा भक्तीमय वातावरणामध्ये राहून गेले परिसरामध्ये स्वामींच्या नामघोषाने परिसर अध्यात्मिक झाला होता हे मंदिर या परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते अनेक प्रकारच्या प्रचिती अनेक भाविक भक्तांना या ठिकाणी मिळालेले आहेत त्यामुळे या मंदिराला एक वेगळंच महत्त्व आहे म्हणून या मंदिरामध्ये होत असलेले सर्वच उत्सव अतिशय उत्साहात होतात.






0 Comments