
पिंपरी -: उजनीच्या धरण क्षेत्रात पारंपारिक मच्छीमारीचा व्यवसाय करणारे भोई,कोळी, आदिवासी,भिल्ल,फासे पारधी समाजाच्या रोजी रोटीवर व त्यांच्या पारंपारिक व्यवसायावर गंडांतर आणून या मच्छी मारीचे ठेकेदार निश्चित करून हे काम काही राजकीय मंडळींनी षडयंत्र करून स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
या निर्णयाला तीव्र विरोध करण्याकरता कृष्णा खोरे विकास महामंडळा, सिंचन भवन पुणे यांच्या कार्यालयासमोर भोई,कोळी, आदिवासी,भिल्ल व फासे पारधी समाजाच्या आया बहिणी व तरुण युवक "आमरण उपोषणाला" बसले होते.
या आमरण उपोषणाला पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक चळवळीतील नेते मारुती भापकर यांनी जाहीररीत्या पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला होता.
सरकारने या आंदोलकांची गांभीर्याने दखल घेतली नाही तर या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहरातील जन चळवळी सहभागी होतील असा इशारा सरकारला दिला होता.
या आंदोलनकर्त्यांची गंभीर दखल घेऊन या ठेकेदारीला स्थगिती देण्यात आली असल्याची लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले. त्यावर हे उपोषण आंदोलन स्थगित झाले असून, पुढे राजकीय नेते व ठेकेदार संगनमताने पुढे उजनी धरणात ठेकेदारी पद्धतीने मासेमारी करण्याचे काम पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. आंदोलनकर्त्यांनी कायम जागृत राहून संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. आम्ही या सर्व आंदोलनकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहोत. सर्व लढवय्ये आंदोलनकर्त्यांचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.

0 Comments