Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या हुल्लडबाज विद्यार्थ्याला वडिलांची कॉलेजमध्ये घुसून बेदम मारहाण.

     पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; ५ मार्च २०२६ : पुण्यातील नामांकित MIT ADT विद्यापीठाच्या आवारात एक हायव्होल्टेज घटना घडली आहे. गेल्या १५ दिवसांपासून एका विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून ऑनलाइन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला विद्यार्थिनीच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले आणि त्याला जाब विचारला.

        यामुळे दोघांमध्ये तीव्र झटापट झाली असून, संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, डी. वाय. पाटील कॉलेजचा हा विद्यार्थी पीडित तरुणीला मागील पंधरा दिवसांपासून वारंवार मेसेज, कॉल्स आणि करुन त्रास देत होता यामुळे तरुणी मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती.

        अखेर तिने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. पूर्वीही कॉलेजकडे तक्रार केली गेली होती, पण कोणतीही कारवाई झाली नाही, असे सांगितले जाते. घटनेच्या दिवशी विद्यार्थी MIT ADT कॅम्पसमध्ये आल्याचे कळताच तरुणीचे वडील थेट तेथे पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्याला रंगेहाथ पकडून जाब विचारला. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू झाला, तो काही क्षणांतच हातघाईवर गेला.


        मुलीच्या वडिलांनी विद्यार्थ्याला चोप दिल्याचे साक्षीदारांनी सांगितले. कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिला, पण संतप्त पित्याला रोखण्याचे धाडस कुणी दाखवले नाही. पित्याने तरुणाला “मुलीला पुन्हा त्रास दिलास तर गंभीर परिणाम भोगावे लागतील” असा इशाराही दिला.

       हा संपूर्ण प्रकार काही विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पुण्यातील शैक्षणिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत वृत्त प्रकाशित केले असून, त्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

• शैक्षणिक संस्थांवर जबाबदारी..

        ऑनलाइन छळाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालक आणि समाजाकडून शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या (विशेषतः मुलींच्या) सुरक्षिततेसाठी अधिक काटेकोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. सायबर बुलिंग, स्टॉकिंगसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कॉलेजांनी अँटी-हॅरासमेंट सेल मजबूत करणे, तक्रारींची त्वरित दखल घेणे आणि पोलिसांशी समन्वय साधणे गरजेचे आहे.या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. पोलिसांकडून चौकशी सुरू असल्यास अधिक तपशील समोर येऊ शकतात.

Post a Comment

0 Comments