Hot Posts

6/recent/ticker-posts

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन.


        पिंपरी (प्रतिनिधी)-: आज गुरुवार, दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे प्रथम मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे विनंम्र अभिवादन करण्यात आले.

        यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल  म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी औद्योगिक विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला, त्यांनी ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांसह शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घातली. महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक विकासाच्या नियोजनात त्यांनी त्यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशी अनेक विकास कामे त्यांनी त्यावेळी केली अशा थोर नेत्यास मी विनंम्र अभिवादन करतो.
           तसेच यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट आणि मा.नगरसेविका सीमा सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्र संचालन सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांनी तर आभार उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांनी मानले.

          सदर जयंती कार्यक्रमास शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, नगरसेविका उज्वला ढोरे, दिप्ती कांबळे, वर्षा जगताप, मा.नगरसविका सीमा सावळे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय जगताप, अभिजीत आल्हाट, शेरबहादुर खत्री, शक्रुल्ला पठाण, अकबर मुल्ला, संपतराव पाचुंदकर, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, भाग्यश्री मस्के, बाबासाहेब चौधरी, सरचिटणीस सुरेंद्रसिंग बाला, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, पदवीधर सेल प्रदीप आवटी, कोमल कवडे, सरचिटणीस बापू सोनवणे, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष कुमार कांबळे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यांदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments