
मोशी (प्रतिनिधी): दि. २६ फेब्रुवारी २०२६, गुरुवारी संघर्ष संस्था व अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष पंकजभाऊ पवार यांच्या वतीने प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे भक्तिमय व पवित्र वातावरणात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात नवीन नगरसेवक श्री तुषार भाऊ सहाणे, श्री योगेश भाऊ लांडगे, सौ. अश्विनी ताई वाबळे आणि श्री डॉ. सुहास कांबळे यांचा मानाचा फेटा शाल, श्रीफळ स्वामींची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
सत्कार संघर्ष संस्थे चे संस्थापक अध्यक्ष श्री पंकज भाऊ पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, प्रभागाच्या विकासासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत प्रामाणिकपणे कार्य करावे.सत्काराला उत्तर देताना सर्व मान्यवर नगरसेवकांनी रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास नागरिक, कार्यकर्ते व प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



0 Comments