Hot Posts

6/recent/ticker-posts

सदनिकेत सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश.


           पुणे; दि.०६ (शशिकांत पाटोळे) : दोन पीडित महिलांची सुटका, एका महिलेस अटकउत्तमनगर परिसरातील एका सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने छापा टाकत मोठी कारवाई केली.

        या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, देहव्यापार चालवणाऱ्या एका महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला सरस्वतीनगर येथील एका कॉम्प्लेक्समधील सदनिकेतून मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

            या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत संबंधित सदनिकेवर छापा टाकला. छाप्यादरम्यान सदनिकेतून देहव्यापार सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

     या कारवाईत एका महिलेस (वय ४५, रा. उत्तमनगर) अटक करण्यात आली असून, तिच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली.या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना समुपदेशन व पुढील पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

      ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

      या कारवाईत पोलिस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक विशाल चव्हाण आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.उत्तमनगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर देहव्यापाराविरोधात पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments