पुणे; दि. ०५ (शशिकांत पाटोळे) : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्य करणारे माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष तसेच लायन्स क्लब कात्रजचे संस्थापक लायन विठ्ठलराव वरुडे पाटील यांना वरुडे पाटील उत्कृष्टता आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
लायन्स आंतरराष्ट्रीय डिस्ट्रिक्ट 3234-डी 2 यांच्या वतीने हा भव्य पुरस्कार सोहळा पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल एम. जे. एफ. लायन राजेशजी अग्रवाल, पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन गिरीशजी मालपाणी तसेच लायन सुनीताजी मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. अनेक लायन्स क्लब सदस्य व मान्यवरांच्या साक्षीने लायन विठ्ठलराव वरुडे पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वरुडे पाटील यांच्या समाजोपयोगी कार्याचे भरभरून कौतुक केले. “अशा निष्ठावान, प्रामाणिक आणि तत्पर समाजसेवकांची आज समाजाला अत्यंत गरज आहे. कोणत्याही क्षेत्रात सचोटीने व सातत्याने काम करणाऱ्या वरुडे पाटील यांच्या कार्यातून सर्वसामान्य गरजू नागरिकांना मोठा आधार मिळतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना लायन विठ्ठलराव वरुडे पाटील म्हणाले, “अशा प्रकारच्या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात अधिक जोमाने व जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळते. हा पुरस्कार मला ज्येष्ठ व वृद्धांच्या सेवेमुळे मिळाला असून, तो मी त्यांनाच समर्पित करीत आहे. भविष्यातही अधिक सचोटीने व प्रामाणिकपणे समाजसेवा करण्याचा माझा प्रयत्न राहील.”हा सन्मान प्रदान केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

0 Comments