Hot Posts

6/recent/ticker-posts

भारती विद्यापीठ पोलिसांनी विधीसंघर्षीत बालकाकडुन एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत केला.

       पुणे; दि. ०४ (शशिकांत पाटोळे) :  भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चोधरी यांना त्यांच गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक विधीसंघर्षीत बालक हा नवले पुलाकडून कात्रज कडे येणारे मुख्य रोडचे दरम्यान राधाकृष्ण गार्डन समोरील बाजुचे सव्हीस रोडवर थांबला आहे. लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता एक विधीसंघर्षात बालक हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्ट‌सहीत दिनांक ०४/०२/२०२६ रोजी २०.१५ वा मिळुन आल्याने त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करुन, त्याचेकडे तपास करता त्यास सदरचा गावठी कट्टा हा त्याचा साथीदार सोमनाथ चांदणे याने दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्या दोघांचेविरुध्द सरकारतर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४२/२०२६, भारतीय हत्यारम अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.

      सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments