घाटकोपर ठाणे-: घाटकोपर पो. ठाणे अंतर्गत दि. २६/११/२०२५ रोजी संध्याकाळी ०६.०० वा.चे पूर्वी हिमालय सोसायटी, एन एस एस रोड, घाटकोपर पश्चिम, मुंबई येथे राहणारी महिला नामे शहनाज अनिस काझी वय ६५ वर्षे हिचा कोणीतरी अज्ञात इसमाने जबरी चोरी करण्याच्या उददेशाने गंभिर जखमी करून ठार मारले. सदर इमारतीतील रहीवासी सायका रईस अन्सारी यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाणे गु.र.नं.९३२/२५ कलम १०३(१), ३०९ (६) भा. न्या.सं. अन्यये दिनांक २६/११/२०२५ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक, निगराणी पथक, दहशतवाद विरोधी पथक, मोटर वाहन चोरी पथक, परिमंडळ ७ सर्व पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी अशी १० पथके नेमणूक करुन गुन्हा घडले ठिकाणचे व येण्या-जाण्याच्या मार्गावरील १५० सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करून अल्प कालावधीत हिमालय सोसायटी परीसर, घाटकोपर प. मुंबई येथील मुख्य स्त्यावरून एक बुरखाधारी महिला मुकुंद सोसायटीत प्रवेश करताना दिसून आली. सदर महिलेच्या संशयास्पद हालचाली वरुन ती जात असलेल्या मार्गावरील सरकारी व खाजगी सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची पाहणी करून स्थानीक खबऱ्यांकडून माहीती घेऊन व तांत्रीक कौशल्याचा वापर करून ताब्यात घेतले व चौकशी करून सदर गुन्हयात अटक केली.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, मा. सह पोलीस आयुक्त, (का.व सु.) श्री. सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. महेश पाटील यांच्या आदेशाने व श्री. राकेश ओला, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ७, मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. शैलेश पासलवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, घाटकोपर विभाग, मुंबई यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सतीश जाधव, पोलीस निरीक्षक, रेवणसिध्द ठेगले (गुन्हे), पो. नि. अशरूद्दीन शेख, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, स.पो. नि. तिरमारे व पथक, स.पो.नि. खरमाटे व पथक, निगराणी पथकाचे पो.उ.नि. पलसे व पथक, तसेच मो/वाहन चोरी प्रतिबंधक पथकाचे अधिकारी पो.उप. नि. पांडुरंग साळुंखे व पथक यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

0 Comments