Hot Posts

6/recent/ticker-posts

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आणि सह आयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे तात्पुरता स्वरूपात सोपवण्यात आला विविध विभागांचा अतिरिक्त कार्यभार....

 

       पिंपरी, दि. १९ नोव्हेंबर २०२५ :  पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची महापालिकेतून मूळ प्रशासकीय विभागाकडे बदली झाली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या विविध विभागांचा कार्यभार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आणि सह आयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.

     आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या विभागासह अग्निशामक, अतिक्रमण, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, विद्युत मुख्य कार्यालय, निवडणूक व जनगणना, स्थापत्य मुख्य कार्यालय तर अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याकडे सध्याच्या विभागासह करसंकलन मुख्य कार्यालय, शिक्षण, माध्यमिक शिक्षण, समाज विकास, जलशुद्धीकरण केंद्र से. २३व क्षेत्रीय क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग, पाणीपुरवठा, मध्यवर्ती भांडार विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच सह आयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे सध्याच्या विभागासह उद्यान व वृक्षसंवर्धन, सर्व क्षेत्रीय कार्यालये, स्थापत्य या विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

• उपायुक्त व सहाय्यक आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल...

      पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण व माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यभार पाहणारे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्याकडे निवडणूक व जनगणना विभागाचा पदभार देण्यात आला आहे. तर समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांच्याकडे शिक्षण व माध्यमिक विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणूक व जनगणना पदाचा कार्यभार स्थानिक संस्था कर विभागाचे सहाय्यक आयुक्त राजीव घुले यांच्याकडे होता. आता या विभागाचा कार्यभार सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर  राजीव घुले यांच्याकडील सहाय्यक आयुक्त निवडणूक पदाचा कार्यभार निरस्त करण्यात आला आहे. 


 आयुक्तांकडे सोपविलेला अतिरिक्त पदभार

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे -

अग्निशमन, अतिक्रमण, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, विद्युत मुख्य कार्यालय, निवडणूक व जनगणना, स्थापत्य विभाग 

...अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर-

करसंकलन मुख्य कार्यालय, शिक्षण, माध्यमिक शिक्षण, समाज विकास, जलशुद्धीकरण केंद्र से. २३ , पाणीपुरवठा, मध्यवर्ती भांडार विभाग

..सह आयुक्त मनोज लोणकर-

उद्यान व वृक्षसंवर्धन, सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग,स्थापत्य ( उद्यान )

.....

Post a Comment

0 Comments