Hot Posts

6/recent/ticker-posts

03 गावठी पिस्टल व 05 जिवंत काडतुस बाळगणाऱ्या 03 आरोपीतांना जेरंबद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


      जालना-: जालना पोलीस दलाने मागील 05 वर्षाच्या तुलनेत सन 2025 मध्ये 28 बनावटी गावठी कट्टे (पिस्टल) व 118 धारदार शस्त्र जप्ती करुन सर्वांत जास्त केल्या कारवाया

     जालना जिल्हयामध्ये अवैध शस्त्र बाळणाऱ्या इसमांचा शोध घेवून कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या.

      त्यानुषंगाने दिनांक 30/10/2025 रोजी अवैध शस्त्र बाळणाऱ्या इसमांचा शोध असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे भिमा भाऊराव वाघमारे, वय 23 वर्ष रा. सोलगव्हाण, ता.जि. जालना हा जालना शहरामध्ये आलेला आहे त्यानुषंगाने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याकडे गावठी बनावटीच्या कट्टा (पिस्टल) बाबत विचारणा करता त्याने जालना शहरामध्ये राहणारा इसम नामे सुशांत ऊर्फ मुन्ना राजु भुरे वय-27 वर्ष, रा.कानडी वस्ती, जालना यास 03 गावठी बनावटीच्या पिस्टल रु.1,20,000/- मध्ये विक्री केल्याचे सांगितले. त्यानुषंगाने सुशांत ऊर्फ मुन्ना राजु भुरे वय-27 वर्ष, रा. कानडी वस्ती, जालना यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 02 गावठी बनावटीच्या पिस्टल व 03 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. त्यानुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

     तसेच आरोपी नामे पारसमणी उर्फ पवन विनोद स्वामी, वय-26 वर्ष, रा. चौधरीनगर जालना यास डिमार्ट जवळ, जालना येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 01 गावठी बनावटीच्या पिस्टल व 02 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन त्यानुषंगाने तालुका पोलीस ठाणे, जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

     अशा दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये 03 पिस्टल व 05 जिवंत काडतुस असा एकुण रु.1,20,000/- किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

      जालना जिल्हा पोलीस दलाने सन 2021 ते दि.30/10/2025 पावेतो अवैध शस्त्र बाळणाऱ्या इसमांवर सन 2025 मध्ये सर्वांत जास्त कारवाया करुन अग्निशस्त्र बाळणाऱ्या एकुण 39 आरोपीतांना अटक करुन त्यांच्याकडुन 28 अग्निशस्त्र जप्त केले तसेच तलबार व इतर धारदार शस्त्र बाळगणाऱ्या 102 आरोपीतांना अटक करुन त्यांच्याकडुन 118 शस्त्रे जप्त केले आहेत.

      सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, सपोनि, सचिन खामगळ, पोउपनि, राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार गोपाल गोशिक, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सतिष श्रीवास यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments