• संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण.
इंदापूर (प्रतिनिधी. गणेश धनवडे)-: अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेमार्फत राज्य व जिल्हास्तरावरील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या वेळी संस्थापक अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब भांडवलकर यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष पदी दत्तात्रय श्रीरंग सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य मार्गदर्शन पदावर दिलीप बापू गुरव, पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष सौ. मानसी ताई पवार, पुरंदर तालुका उपाध्यक्ष राहुल पवार, जेजुरी शहर अध्यक्ष सचिन कुंभार, पुरंदर तालुका महिला अध्यक्षा सौ. मयूरी ताई जरांडे, आणि जेजुरी शहर महिला अध्यक्षा सौ. योगिता ताई मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास महिला प्रदेश अध्यक्षा सुजाता ताई गुरव, महाराष्ट्र राज्य सचिव अतुल पवार, खजिनदार इजाज पानसरे, सल्लागार मंगेश गायकवाड, संस्थापक सदस्य राहुल भोंडे, सदस्य निखिल स्वामी, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर मुलाणी, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शाम दाजी जगताप, सासवड शहर अध्यक्ष सचिन वढणे, उपाध्यक्ष समीर बागवान, तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जरांडे, तात्या भोंडे, सुमित दादा पवार, अमित दादा पवार, सागर भाऊ मोरे, अभिषेक पवार, अभि सोनवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम दाजी जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल भोंडे यांनी मानले. या वेळी संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला व नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यभरात संस्थेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संस्था समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणेल. नव्या पदाधिकाऱ्यांमुळे संस्थेला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल.
कार्यक्रमात उत्साह, एकता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.


0 Comments