• कळंब येथील वरपे कुटुंबातील गायत्री आणि सानिकाला पोलिस होण्याच्या स्वप्नाला नवी उभारी.
पिंपरी (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अतिवृष्टीने शेती मालाचे मोठे नुकसान झाले. वारंवार होणाऱ्या पावसाने शेतकरी दादाराव वरपे यांची संपूर्ण सोयाबीन शेती उद्ध्वस्त झाली. घर चालवायचे, शिक्षणाची फी भरायची, आणि मुलींचे पोलिस होण्याचे स्वप्न सगळं काही संकटात सापडलं होतं. मात्र संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तसेच मूळचे कळंब तालुक्यातील तांदुळवाडी गावचे रहिवाशी सतीश काळे यांनी मदतीचा हात पुढे करत १ लाख रुपयांची मदत अकॅडमीच्या खात्यात जमा केली. त्यामुळे गायत्री आणि सानिकाला पोलिस होण्याच्या स्वप्नाला नवी उभारी मिळाली आहे.
“हात द्या आणि साथ मिळेल तर अशक्य काहीच नाही. कळंब तालुक्यातील मस्सा (खं) गावातील दादाराव वरपे यांच्या दोन मुली गायत्री आणि सानिका या पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी परंडा येथील कमांडो कॅरिअर अकॅडमी मध्ये शिकत आहेत. अशा कठीण परिस्थितीत, संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी पुढाकार घेत पुण्यातील दानशूर व्यक्तींशी संपर्क साधला. त्यानंतर या दात्यांच्या मदतीने दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये असे मिळून एकूण १ लाख रुपये थेट अकॅडमीच्या खात्यात जमा केले.
काळे यांच्या मदतीने वरपे कुटुंबाच्या चेहऱ्यावर आता आनंदाश्रू आहेत. आमच्या मुलींचं शिक्षण सुरू राहील, त्यांची स्वप्नं मोडणार नाहीत, हीच मोठी दिवाळी आमच्यासाठी,” असं भावनिक उद्गार दादाराव वरपे यांनी व्यक्त केले.
शेती उद्ध्वस्त झाली, पण समाजातील दानशूर हातांनी पुन्हा उमेद दिली. गायत्री आणि सानिका आता अधिक जोमाने तयारी करत आहेत. “पोलीस होऊन वडिलांचे श्रम आणि समाजाची मदत फेडायची आहे, असं त्या निर्धाराने सांगत आहेत.
•> पावसामुळे धाराशिवसह मराठवाड्यात बळीराजाचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले. या मुलांना तसेच बळीराजाला मदत करण्याचे उद्देशाने मदतीसाठी पुढाकार घेतला. मुलींना शिक्षण मिळेल याचे समाधान आहे.
- सतीश काळे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड.
• आपणास अधिक काही माहिती हवी असल्यास.
मुलींचे वडील दादाराव वरपे यांचा मो नं 7559109244
कमांडो कॅरिअर अँकॅडमीचे तनपुरे सर
7757863205


0 Comments