निगडी -: सेक्टर क्र. २२ मध्ये पाणीपुरवठा कामादरम्यान पाणी अपव्यय – चौकशी व जबाबदारी निश्चित करण्याची मागणी सुनील कांबळे ( सचिव सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट) यांनी केली आहे.
निगडी सेक्टर क्र. २२ मधील राजहंस सोसायटी शेजारी पाणीपुरवठ्याचे काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. काम चालू असताना पाणीपुरवठा विभागाकडून वेळेवर पुरवठा बंद न केल्यामुळे हा अपव्यय झाला असल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्या शहरामध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर असून अशा परिस्थितीत झालेला अपव्यय ही चिंतेची बाब आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.
• मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
1. घटनेबाबत चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी.
2. अपव्यय झालेल्या पाण्याच्या प्रमाणाचा आढावा घेऊन त्यानुसार जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात करण्याचा विचार करावा.
3. अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काम सुरू करण्यापूर्वी पाणीपुरवठा बंद करण्याची कार्यपद्धती काटेकोरपणे राबवावी.
4. चौकशी अहवाल पारदर्शक पद्धतीने नागरिकांसमोर सादर करावा.
प्रशासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.


0 Comments