पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)-: निगडी सेक्टर नंबर 22 मधील इमारत क्र. 1 ते 15 या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून परिसरात अस्वच्छतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत आमचे सहकारी विकी नायर आणि कुणाल घाडगे यांनी आम्हाला माहिती दिली आहे. इतकी गंभीर परिस्थिती असूनदेखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अजूनपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही, हे अतिशय खेदजनक आहे.
मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मा. शेखर सिंग साहेबांकरिता जोरदार मागणी करतो की – संबंधित इमारत क्रमांक 1 ते 15 मधील जबाबदार व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होणार नाही यासाठी परिसरात तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी.भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि परिसरात स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी महापालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी सुनिल कांबळे सचिव – सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पिंपरी चिंचवड शहर यांनी केली आहे.

0 Comments