Hot Posts

6/recent/ticker-posts

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गोरेगाव पूर्व मुंबई पोलीस तुकडीच्या वतीने अमर जवान स्मारकास श्रद्धांजली वाहून सलामी देण्यात आली.

 

      पुणे -: १५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वनराई पोलीस ठाणे येथे नुकतीच बदली झालेले खडकी येथील कर्तव्यदक्ष  पोलीस इन्स्पेक्टर विकास जाधव साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सामूहिक राष्ट्रगीत बोलून अमर जवान या स्मारकास गोरेगाव पूर्व मुंबई येथील पोलीस तुकडीच्या वतीने आपलं कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस जवान व अधिकारी यांना श्रद्धांजली वाहून सलामी देण्यात आली.

   

     ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस तुकडीच उद्देशून बोलताना विकास जाधवसाहेब यांच्याकडून सांगण्यात आले १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाचा शोर्य व बलिदान आणि ऐक्याच्या अभिमानाने साजरा करायचा दिवस आहे. स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. आपण मिळवलेलं हे स्वतंत्र हे केवळ भेट नाही तर जबाबदारी आहे देशाची प्रगती एकता आणि सन्मान जपण्याची व देशाप्रती आपलं कर्तव्य बजावण्याची ही वेळ आहे.












Post a Comment

0 Comments