Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रह्मकुमारी डॉ. त्रिवेणी दीदी बहिरट यांना "बोपोडी भूषण २०२५" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. - शशिकांत पाटोळे

 

      पुणे -: काल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला बोपोडी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ब्रह्मकुमारी 'डॉ. त्रिवेणी दीदी बहिरट' यांना अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कॅनडा युनिव्हर्सिटीच्या वतीने "आध्यात्मिक विज्ञान विषयात डॉक्टरेट" प्रदान करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार ठेवण्यात आला. त्यात बोपोडीतील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांच्या वतीने दीदींना "बोपोडी भूषण २०२५" हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच बोपोडी मराठा समाजाच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला. 

         

       याप्रसंगी उपस्थित मान्यवर माननीय माजी नगरसेवक, पीएमपीएल अध्यक्ष प्रकाशजी ढोरे, माजी नगरसेवक आनंदजी छाजेड, माजी नगरसेवक श्रीकांतजी पाटील, माजी नगरसेवक शैलेजाजी खेडेकर, माजी नगरसेवक नंदलालजी धीवार, माजी पीएमटी अध्यक्ष ज्ञानेश्वरजी मुरकुटे, माजी पीएमटी सभासद बाळासाहेबजी पाटोळे, माजी उपमहापौर सुनीताजी वाडेकर, पुणे शहर भाजपा अल्पसंख्यांक अध्यक्ष अनिलजी भिसे, पुणे शहर काँग्रेस सरचिटणीस विनोदजी रणपिसे, पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्रजी भुतडा, सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी टेके, विजयजी जाधव, विजयजी ढोणे, जीवनजी घोंगडे, राजेंद्रजी बहिरट पाटील, समस्त बोपोडी गावकरी मंडळ माजी विद्यार्थी संघ विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर व बोपोडीकर याप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments