पुणे -: दि.०७/०८/२०२५ रोजी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना गुप्त बातमीदारा कडून बातमी मिळाली की, ज्ञानेश्वर पादुका चौक, दिनदयाळ हॉस्पीटल शेजारी गल्ली, एफ सी रोड या ठिकाणी रेकार्ड वरील गुन्हेगार अभिषेक टैंकल हा उभा असून त्याच्या जवळ गावठी पिस्टल आहे. अशी मिळालेली बातमी मिळाल्याने पोलीस उप-निरीक्षक अजित बडे यांनी श्री. महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी योग्य त्या सुचना देऊन योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, पोलीस उप-निरीक्षक अजित बडे हे त्यांचा पोलीस स्टाफ व दोन पंथाना पाचारण करुन पोलीस स्टेशन येथे स्टेशन डायरी नोंद करुन वर नमूद पोलीस स्टाफ, पंच असे रवाना झालो.
बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी ज्ञानेश्वर पादुका चौक, दिनदयाळ हॉस्पीटल शेजारी गल्ली, एफ सी रोड येथे जाऊन थोडे आड बाजूस थांबून पाहिले असता एक इसम आम्हाला संशयास्पद दिसला. त्याने आमचेकडे पाहिले असता तो तेथुन पळ काढुदु लागला तेव्हा आम्ही त्याचा पाटलाग करुन शिताफीने पकडून त्यास आमची स्वतःची व सोबतच्या स्टाफची, पंचाची ओळख सांगून त्याचे अंगझडतीचे कारण त्यास सांगून त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता अभिषेक राजू टेंकल वय २३ वर्ष रा. प्लॉट नंबर ४१ विष्णुकृपा नगर, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ, शिवाजीनगर पुणे असे सांगितले. तेव्हा नमुद इसमाची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला ३६,०००/- रु. कि.चा एक गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक राऊड मिळून आल्याने शिवाजीनगर पो.स्टे.गु.र.नं. १२४/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम क. ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करुन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही माः, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त, परि ०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे श्री. साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. धनंजय पिंगळे यांचे सुचना प्रमाणे पोलीस उप-निरीक्षक अजित बडे, व पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, सचिन जाधव, दिपक रोमाडे, इसाक पठाण, कृष्णा सांगवे, सुदाम तायडे यांनी केली आहे.

0 Comments