Hot Posts

6/recent/ticker-posts

मोका गुन्हयातील पाहिजे आरोपीस केले जेरबंद...

 


युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर..

      पुणे शहर-: मोका गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेवुन कायदेशीर करवाई करणेबाबत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट २. अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर व अमोल रसाळ व पोलीस अंगलदार असे पेट्रोलिंग करीत होते. 

      सदर पेट्रोलींग दरम्यान पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुभार व विजय पवार यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने आंबेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३/२०२५ भा.न्या. सं.क.१०३,१०९,१२६(२),३५२.३ (५) सह क्रिमिनल लॉ अॅमेंडमेट कलम ७, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (i), ३(२) व ३ (४) गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे रुपेश राजन केंद्रे वय १९ वर्ष रा. सच्चाईमाता मंदिर अटल नंबर १३, टॉवर शेजारी जैन मंदिर कात्रज, पुणे याचा शोध घेवुन त्यास शिताफिने सच्चाई माता पाण्याचे टाकीजवळ, आंबेगाव खुर्द येथे ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.

     सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर अति. कार्यभार (गुन्हे)  विवेक मासाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार, शंकर नेवसे, संजय जाधव, निखिल जाधव, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, ओगकार कुंभार, संजय आबनावे व विशाल भिलारे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments