Hot Posts

6/recent/ticker-posts

सेंट पीटर इंग्लिश मीडियम स्कूल, रुपीनगर येथील शैक्षणिक व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात त्वरित चौकशी व कारवाई व्हावी-: सुनील कांबळे

 

       निगडी पिंपरी चिंचवड-:  सेंट पीटर इंग्लिश मीडियम स्कूल, रुपीनगर या शाळेत पालक आणि विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे:

1. शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावलेला असून शिक्षकांची कमतरता आहे. अनेक वेळा विषय शिक्षक अनुपस्थित असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

2. शाळेच्या फीवरून जबरदस्ती: फी थोडा उशिरा भरली गेल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही अथवा निकाल रोखून धरला जातो. पालकांवर मानसिक दबाव आणला जातो.

3. कंपलसरी बुक्स आणि युनिफॉर्म विक्री: शाळा व्यवस्थापनाने ठरवलेल्या दुकानदाराकडूनच पुस्तके व युनिफॉर्म घेण्यास पालकांना सक्ती केली जाते. पण वेळेत ड्रेस मिळत नाहीत, तरीही बाहेरून घेऊ देत नाहीत.

4. स्पोर्ट्ससाठी केलेल्या वचनांचे उल्लंघन: शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या स्पोर्ट्ससंबंधीच्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. ग्राउंड, साहित्य, प्रशिक्षक यांचा अभाव आहे.

5. शाळेतील स्वच्छतेचा अभाव: मुलींसाठीचे स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ असून नियमित साफसफाई होत नाही. काही वर्गांमध्ये पंखे बंद अवस्थेत आहेत.

6. शाळेच्या आवारात व वर्गांमध्ये स्वच्छतेचा अभाव: वातावरण घाणेरडे असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका आहे.

      वरील सर्व बाबी या शिक्षणाच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन असून पालकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक करणाऱ्या स्वरूपाच्या आहेत.    



      • मागणी:

1. सेंट पीटर इंग्लिश मीडियम स्कूलची त्वरित चौकशी करून ऑडिट करावे.

2. विद्यार्थ्यांच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या बाबींसाठी शाळेविरुद्ध कठोर कारवाई करावी.

3. शाळेतील शिक्षणाचा दर्जा व सुविधा यावर नियंत्रक ठेवावा.

4. गैरवर्तन करणाऱ्या व्यवस्थापनावर शिक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत.

       अन्यथा, आम्ही पालक व विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सार्वजनिक आंदोलन करण्यास बाध्य होऊ. अशी मागणी शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड यांना आहे.

        आपल्याकडून त्वरित कार्यवाहीची अपेक्षा आहे. सुनिल मल्हारी कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय विभाग – सचिव, पिंपरी चिंचवड शहर, आपल्याला वरिल प्रमाणे अत्यंत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी सादर करत आहे:

Post a Comment

0 Comments