Hot Posts

6/recent/ticker-posts

भरधाव ट्रॅव्हल्सची कारला धडक - शशिकांत पाटोळे

 

       पुणे : पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गावर बंद पडलेली इरटीगा कार टोव्हींग क्रेनला टोचन करून शोरूमला घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने एट्रिगा कारला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत डी मार्टसमोर रविवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. याबाबत सचिन गणपत रवले (वय ४०, रा. मालचौंडी ता. जावळी) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ट्रॅव्हल्स चालक संतोष केशव माने (रा. सांगली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments