• संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड दि.१४-: स्वराज्य टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे शाक्तवीर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. त्यांच्या बलिदानातून स्वाभिमानी धगधगत्या निखाऱ्यासारखा स्वराज्याचा इतिहास रचला गेला असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी केले.
आबासाहेब ढवळे म्हणाले की, संभाजीराजे संकटांवर केवळ स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्व आक्रमकांच्या उरात धडकी भरवली स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला केवळ ९ वर्षांच्या काळात एकही पराभव तह वा माघार नसलेल्या १२८ लढाया त्यांनी जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला त्या छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्याला वारसा आहे हे भाग्याचे आहे.




0 Comments