Hot Posts

6/recent/ticker-posts

काळेवाडी पोलीस ठाणे येथिल फिर्यादी यांची शेअर ट्रेडींगमध्ये ४४,५०,०००/- रु.ची फसवणुक करणारा आरोपी सायबर पोलीस ठाणेकडुन अटक.

 

     काळेवाडी पिंपरी - काळेवाडी पोलीस ठाणे येथे दाखल असणा-या गुन्हयातील फिर्यादी यांना यातील आरोपी विशाल व्हॉट्सअप नं. ६३७६७८६९६० व ट्रेडींग मॅनेजर दिव्या भट व्हॉट्सअप नं. ८५२८३४१८२९ यांनी VIP N3 Stock Market Success Strategies Group नावाच्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये जॉईन करुन त्यांचे Creation Investments FPI LLC या कंपनीची माहीती देऊन कंपनीचे सदर Creation Investments FPI LLC अॅप्लिकेशनची लिंक पाठवुन डाऊनलोड करण्यास सांगुन त्यांचे सांगण्याप्रमाणे त्यांचे कंपनीचे सदर अॅप्लिकेशन प्लॅटफॉर्मवरुन शेअर मार्केट स्टॉक ट्रेडींग केल्यास चांगला परतावा देण्याची हमी देवुन त्यांनी सांगितलेल्या स्टॉक ट्रेडींग करीता वेगवेगळे बँक अकाऊंटनंबर एकुण रुपये ४४,५०,०००/- एवढी गुंतवणुक करण्यास भाग पाडुन अॅप्लिकेशनवर २ कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा दाखविण्यात आला होता.

       सदर रक्कम फिर्यादी यांनी काढण्याचा प्रयत्न केला असता ती काढण्यासाठी १५ टक्के रक्कम ३०,०७,०००/- रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी फिर्यादी यांना त्यांनी भरलेल्या ४४,५०,०००/- ची आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी विशाल व्हॉट्सअप नं. ६३७६७८६९६० व ट्रेडींग मॅनेजर दिव्या भट व्हॉट्सअप नं. ८५२८३४१८२९ तसेच पैसे पाठविलेल्या वेगवेगळ्या बँक अंकाउट धारक, अॅप्लिकेशन धारक यांचेविरोधात विरोधात कायदेशीर तक्रार दिली होती.

        सदर तक्रारी अर्जाचा तपास करीत असताना आरोपी यांनी फसवणुकीची रक्कम वेगवेगळया बँक अकाऊंटवर घेतली असल्याने त्या अनुषंगाने तपास करीत असताना आरोपी यांनी बंधन बँक अकाउंट नंबर - २०१०००४३६७०६८४ या खात्यामध्ये २,००,०००/- रु घेतले असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने तपास करता वरिल नमुद अकाऊंट मधुन आय.सी.आय.सी.आय बँक अकाऊंट नं १८७८०५००१९४९ या खात्यामध्ये ६,००,०००/- रुपये जमा झाले असल्याने त्याअनुषंगाने तपास केला असता सदर बँक अकाऊंट हे JEWEL THRRONE AGROCORP PRIVATE LIMITED या नावाने असुन सदर अकाऊंटचे अकाऊंट धारक नामे ०१) अक्षय राजेंद्र बनेकर व २) गणेश चंद्रकांत थोरात यांच्या नावावर असल्याची माहीती प्राप्त झाली होती. 

      वरील दोन्ही अकाऊंट धारकाचे नाव व पत्ते पुणे जिल्हयातील असल्याने त्यांचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेतला असता त्यातील अक्षय राजेंद्र बनेकर हा मिळुन आल्याने त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने त्याचा मित्र नामे अक्षय उर्फ गणेश थोरात याच्यासह जाँईट अकाऊंट काढुन ते अकाऊंट सायबर गुन्हयासाठी पाहीजे आरोपी यास दिले असल्याचे सांगीतले. त्यावरुन अक्षय राजेंद्र बनेकर रा. बाणेर यास काळेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं १८४ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८ ( ४ ), ३(५) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ (सी), ६६ (डी). या गुन्हयात काळेवाडी पोलीस ठाणे याच्या ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस ठाणे येथे चालु आहे.

       सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मा. डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी- अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे - पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. डॉ. विशाल हिरे - सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोलीस अंमलदार परशुराम चव्हाण, सुरज शिंदे, दिपक भोसले, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, श्रिकांत कबुले, दिपाली चव्हाण, सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.


Post a Comment

0 Comments