पिंपरी चिंचवड: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी येथे सध्या कोणताही अधिकृत कंत्राट (टेंडर) जाहीर न करता काही कामे सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. सार्वजनिक पैशाचा वापर असा नियमबाह्य पद्धतीने करणे ही गंभीर बाब असून, यात पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो.
कोणतीही निविदा प्रक्रिया न पार पाडता सुरु असलेली ही कामे कोणत्या आधारावर आणि कोणाच्या निर्देशाने चालू आहेत, याची तात्काळ चौकशी होणे आवश्यक आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री. शिखर सिंग यांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हा प्रकार जर दडपशाही किंवा फायदेशीर गटांना लाभ मिळवून देण्यासाठी करण्यात आला असेल, तर हे सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाशी गद्दारी करणारे कृत्य ठरेल.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी सामाजिक न्याय विभाग सचिव पिंपरी चिंचवड शहर सुनिल कांबळे - मो. नं 7057511723


0 Comments