Hot Posts

6/recent/ticker-posts

टेम्पोतून गुटख्याची वाहतूक करणा-या इसमास पकडून. 8,60,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

 

•  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी.

      कोल्हापूर-: मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित साो, यांनी कोल्हापूर जिल्हयातील अवैद्य व्यवसायाबाबत माहिती मिळवून कठोर कारवाई करुन अवैद्य व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिल्या आहेत.

      मा, पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अवैध व्यवसायाचे अनुषंगाने माहिती काढून कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार माहिती काढत असताना पथकातील पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दिनांक १८/०५/२०२५ रोजी एक इसम टेम्पो नं. MH-५१-८-०४४६ मधुन निपाणी येथुन गुटखा घेवून पुणे बेंगलोर हायवेवरून सांगलीकडे जाणार आहे. अशी बातमी मिळालेने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेच्या हीतील हायवेवरील बुधले मंगल कार्यालय येथे सापळा लावून गुटखा वाहतुक करीत असताना सुपर कॅरी कंपनीचा टेम्पो नं. MH-५१-८-०४४६ पकडला. टेम्पो मधील चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रविंद्र वसंत पाटील, वय 33 वर्षे, रा. रुई फाटा, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असे सांगितले. टेम्पोमध्ये असलेल्या मालाबाबत त्याचेकडे विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर पंचासमक्ष टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये विमल पान मसाला, हिरा पान मसाला, महा रॉयल, व्ही-१ अशा एकूण ७ गोण्या भरलेल्या ३,१०,०००/- रूपये किंमतीचा गुटखा व ५,५०,०००/- रूपये किंमतीचा टेम्पो असा एकूण ८,६०,०००/-रूपये किंमतीचा माल कायदेशिर प्रक्रीया करून जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत शिरोली एम.आय.डी.सी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे करवी चालु आहे.

      सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव, शेष मोरे, संतोष गळवे व पोलीस अंमलदार विशाल खराडे, वैभव पाटील, योगेश गोसावी, प्रदिप पाटील, महेंद्र कोरवी, राजु कांबळे, शिवानंद मठपती, गजानन गुरव, अरविंद पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, अमित सर्जे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments