: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमाचे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांकडून कौतुक...
पिंपरी, दि. ९ मार्च २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक) अशा प्रकारचा पहिलाच वाहन-मुक्त दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद अबालवृद्धांनी घेतला. लहान मुले, महिलांचा देखील मोठा सहभाग या उपक्रमात दिसून आला.
झुंबा, हास्ययोग, लाईव्ह संगीत, पथनाट्य, नृत्यप्रदर्शन, खेळ यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर, काल महिला दिनानिमित्त सायंकाळी नृत्यप्रदर्शन, सायकलींग,खेळ पैठणीचा, लाईव्ह संगीत, प्रश्नमंजुषा व अन्य मनोरंजनात्मक उपक्रम घेण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या अनोख्या कार्यक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
.....
अधिकाऱ्यांचा नागरिकांशी संवाद
"चाय पे चर्चा" या कार्यक्रमात माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी व नागरिक यांच्यामध्ये संवाद साधण्यात आला. सार्वजनिक वाहतूकीस चालना देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.





0 Comments