Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक मानवाधिकार दिन चाकण येथे उत्साहात साजरा

 

          चाकण (प्रतिनिधी) दिनांक १२/१२/२०२४- मानव संसाधन विकास संस्थेच्या  माध्यमातून मानवधिकार दिन साजरा करण्यात आला.  संघटणेच्या पदाधिकाऱ्यांनी  वंदनीय  महापुरूषांच्या प्रतिमेचे  पूजन करुन  कार्यक्रमास सुरवात केली.

        संघटणेचे अध्यक्ष ॲड.अनिल म्हाळसकर सर यांच्या मार्गदर्शनाने आणि  प्रधान सचिव श्री सुनिल उबाळे सर यांच्या सहकार्याने  कार्यक्रम  सुरळीत पार  पाडला. 


             या प्रसंगी  महाराष्ट्र अध्यक्ष  सौ. रिबेकाताई शिंदे यांनी  मानवाधिकार  म्हणजे काय आहे आणि तो  कसा आबादित  राहिल याचे  मार्गदर्शन केले, भारताला देशाला बाबासाहेब  लाभले नसते  तर  आज  आपण  माणसाप्रमाणे  जगु शकलो  नसतो, महाराष्ट्रला  शिवाजी महाराज लाभले  हे  आपल  भाग्यच  समजाव कारण  बाबासाहेबांनी  आणि  महाराजांनी  दिलेला  वारसा   आमची  संघटना  पुढे  घेऊन जात आहे  अशी ग्वाही  रिबेकाताई शिंदे यांनी दिला.


      कार्यक्रमासाठी  संघटणेचे  अनेक कार्यकर्ते  उपस्थित  होते  संघटणेचे  राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी, बाळासाहेब  रायकर, यांनी  सूत्रसंचालन केले, महा. राज्य  अध्यक्ष   किशोर पुजारी  उपाध्यक्ष  यतीन पालकर, महा. राज्य सचिव  नरेश आनंद  ,महा. राज्य  जनसंपर्क अधिकारी कालुगिरी  गोस्वामी  , महा. राज्य जनसंपर्क अधिकारी  शब्बीर  शेख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष  बापुसाहेब ,पुणे जिल्हा जनसंपर्क अधिकारी गणेश  भोर  , सुनिल खंडागळे, राहुल  राठोड  ,सचिन  आमले, राजेश सावंत, तालुका सचिव  काशिनाथ बनसोडे,   भारत पवार जुन्नर तालुका जनसंपर्क अधिकारी रागिनी आळे,  मोहिनी  भडंगे, कुंजलता पवार, पुनमआसंगीकर आदी मोठ्या  संख्येने उपस्थित  होते.

          मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून  संघटणेच्या वतीने  समाजासाठी  हिताचे  काम  करणाऱ्या  समाजसेवकाना  मानवभुषण  पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.  त्या  वेळी  दिशा  सोशल  फाउंडेशन वेलफेअरच्य अध्यक्ष  दिशा पवार, उपाध्यक्ष  वैशाली  पानसरे,  तसेच  शेतकरी संघटनेचे वसंत  लोणारी  यांना  पुरस्कृत  प्रदान करण्यात आला . तसेच  मानवाधिकार  दिनानिमित्त  अनेक  मान्यवरांनी  आॅफिसला भेट  दिली आणि संघटणेप्रती  आदर व्यक्त केला.

            त्यावेळी  सामाजिक कार्यकर्ते सचिन वाघमारे, विष्णुदास  थिटे, चाकण नगरपरिषद येथील अधिकारी  सुनिल गोर्डे आणि  त्यांचे  सहकारी  वर्ग  देखिल  उपस्थित  होता.  तसेच  महाराष्ट्र राज्य  अध्यक्ष  सौ.  रिबेकाताई शिंदे  यांनी आणि  सर्व स्थानिक  पदाधिकर्यांना मिळुन   पुर्ण   कार्यक्रम  अगदी व्यवस्थित पणे  पार  पाडला,  रिबेकाताई शिंदे यांनी आलेल्या सर्व  पाहुण्यांचे मनापासुन आभार मानले  .


Post a Comment

0 Comments