Hot Posts

6/recent/ticker-posts

पुनावळे परिसरात राहुल कलाटे समर्थकांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार

 


        चिंचवड :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचाराने चांगला जोर पकडला आहे. राहुल कलाटे समर्थकांनी पुनावळे परिसरात ‘डोअर टू डोअर’ मतदारांच्या भेटी घेत प्रचार सुरू केला आहे.


       पुनावळे गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल तानाजी कलाटे यांच्या प्रचारार्थ समर्थकांनी पुनावळे गावठाण, कोयते वस्ती, पांढरे वस्ती, काटे वस्ती, गायकवाड नगर, सावंत पार्क, पवनानगर, ताजणे वस्ती, ढवळे नगर, माळवाडी पुनावळे ग्रामस्थांना भेटून प्रचार पत्रक दिले. ग्रामस्थांना मतदारांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील क्र.१ नंबरचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत होते.


       यावेळी पुनावळे गावचे माजी सरपंच लक्ष्मण मोहिते, उपसरपंच सुभाष रानवडे, बाळासाहेब बोडके, शिवसेना विभाग प्रमुख नितीन दर्शले, शिवसेना विभाग संघटक अमित दर्शले, निलेश ढवळे, अतुल ढवळे, नवनाथ गायकवाड, सागर बोरगे, गणेश फेंगसे, सोमनाथ फेंगसे, नवनाथ मोहिते, अनिकेत पांढरे, माऊली कुदळे, सागर शिंदे, विठ्ठल तात्या कलाटे, विजय दादा कलाटे, मोहनदादा भूमकर, केदार दर्शले, संतोष दर्शले, ऋषिकेश पांढरे यांचे सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments