Hot Posts

6/recent/ticker-posts

रवींद्र ओव्हाळ यांची असंघटित कामगार विभाग शहराध्यक्षपदी निवड.

 

         पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२४) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे क्रियाशील पदाधिकारी रवींद्र कमल रामदास ओव्हाळ यांची असंघटित कामगार विभाग पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

         उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रवींद्र ओव्हाळ यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. युवा नेते पार्थ पवार यांनी देखील रवींद्र ओव्हाळ यांचे नियुक्ती बद्दल अभिनंदन केले. रवींद्र ओव्हाळ यांना नियुक्ती पत्र देताना  असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल, शहर कार्याध्यक्ष फझल शेख, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवती शहर अध्यक्ष वर्षा जगताप, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे,

   


  ॲड. गोरक्ष लोखंडे, डी. डी. कांबळे, संजय अवसरमल, माऊली मोरे, दीपक साकोरे आदी उपस्थित होते. रवींद्र ओव्हाळ यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिटणीस पदावर आणि दहा वर्षांपेक्षा जास्त काळ राष्ट्रवादी शहर उपाध्यक्षपदी काम केले आहे.

--------------------------------------


Post a Comment

0 Comments